Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीला काकडी कापून त्याच्या देठापासून वेगळी केली जाते? जाणून घ्या...

Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीला काकडी कापून त्याच्या देठापासून वेगळी केली जाते? जाणून घ्या...

जी कृष्णाष्टमी, अष्टमी रोहिणी, गोकुळाष्टमी, श्री कृष्ण जयंती आणि श्री जयंती म्हणून ओळखली जाते.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणूनच दरवर्षी या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. जी कृष्णाष्टमी, अष्टमी रोहिणी, गोकुळाष्टमी, श्री कृष्ण जयंती आणि श्री जयंती म्हणून ओळखली जाते.

जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता काकडी कापून त्याच्या देठापासून वेगळी केली जाते. वास्तविक ही परंपरा पाळली जाते कारण या दिवशी काकडीला भगवान श्रीकृष्णाच्या देवकीपासून वेगळे होण्याचे प्रतीक मानले जाते. कारण जन्माष्टमीच्या दिवशी काकडीची देठ मुलाची नाळ मानली जाते आणि श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी कापली जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता काकडी कापली जातात. यानंतर श्रीकृष्णाची आरती केली जाते. त्यानंतर त्यांना भोग दिला जातो. यानंतर लाडू गोपाळला झुलवले जाते.

Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीला काकडी कापून त्याच्या देठापासून वेगळी केली जाते? जाणून घ्या...
Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जाणून घ्या पारंपारिक पूजा पद्धत

पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म आई देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात झाला होता. त्याच्या आधी, देवकीचे इतर सातही पुत्र कंसाने मारले. श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा तुरुंगाचे सर्व कुलूप आपोआप उघडले आणि कारागृहाचे रक्षकही गाढ झोपेत पडले, असे म्हणतात. यानंतर त्याचे वडील वासुदेव हे बालक कृष्णाला घेऊन नंद गावात गेले आणि त्याला त्याचा मित्र नंद बाबाच्या स्वाधीन केले. भगवान श्रीकृष्ण मोठे झाल्यावर त्यांनी आपल्या मामा कंसाचा वध करून सर्वांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com