आधार कार्ड व्हेरीफिकेशनसाठी नवा नियम; जाणून घ्या नवी प्रक्रिया
आधार कार्ड पडताळणी अर्थात व्हेरीफिकेशनसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे.आता तुम्हाला आधार ऑफलाईन अर्थात कोणत्याही इंटरनेट पुरवठ्याशिवाय किंवा ऑनलाईन देखील तपासता येणार आहे.नवीन नियमानुसार तुमच्या सहीला आता जास्त महत्व आहे. आता व्हेरीफिकेशनसाठी तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेले कागदपत्रे सादर करावे लागणार आहेत.
तुमची डिजिटल सही असलेले हे कागदपत्रे आधार कार्ड संबंधीची सरकारी संस्था अर्थात UIDAI द्वारे जारी केले जाणार आहेत. डिजिटल सही असलेल्या या कागदपत्रावर तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार आकडे दिले जातील.
या नव्या नियमावलीत ई-केवायसी ऑफलाईन पडताळणीची सविस्तर प्रक्रिया देखील सांगण्यात आली आहे. आता ई-केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी कोणत्याही अधिकृत एजन्सीला पेपरलेस ऑफलाईन आधार केवायसी देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.या नियमानुसार ती एजन्सी आधार धारकाने दिलेला क्रमांक, नाव, पत्ता ही सगळी माहिती केंद्राच्या डेटाबेससोबत जुळवून बघेल आणि ही सगळी माहिती बरोबर असेल तरच व्हेरीफिकेशनची प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे.