नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 'या' प्रेरणादायी विचारांद्वारे करा अभिवादन
Netaji Subhash Chandra Bose Birth Anniversary : कायम प्रेरणेचे स्त्रोत असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारीला जयंती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी हे महत्वाच्या नावापैकी एक. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ आणि ‘जय हिंद’ नारा देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली. नेताजींचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. नेताजींच्या जयंतीनिमित्त हे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करुन त्यांना विनम्र अभिवादन करा.
एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.
- नेताजी सुभाषचंद्र बोस
डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.
- नेताजी सुभाषचंद्र बोस
स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल हे मला ठाऊक नाही! पण मला हे माहित आहे, शेवटी विजय आपलाच असेल!
- नेताजी सुभाषचंद्र बोस
फक्त चर्चा केल्याने कधीही वास्तविक इतिहासात बदल होत नाही.
- नेताजी सुभाषचंद्र बोस
जाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही.
- नेताजी सुभाषचंद्र बोस