तरूणीने साकारली दुर्गा देवीची थ्री डि रांगोळी

तरूणीने साकारली दुर्गा देवीची थ्री डि रांगोळी

Published by :
Published on

भंडारा, उदय चक्रधर
आज पासून सुरु झालेल्या नवरात्रीच्या निम्मिताने भंडारा शहरातील नामवंत रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी शहरातील प्रसिद्ध शीतलामाता मंदिरात दुर्गा देवी ची थ्रीडी रांगोळी साकारली आहे.

विशेष म्हणजे 10 फुट ऊंच व 10 रुंद असलेल्या या थ्री डि रांगोळीला तयार करण्यात 8 दिवसाचा कालावधी लागला असून तब्बल 60 किलो रांगोळी लागली आहे.

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या रांगोळीच्या माध्यमातून अती सुंदर अशी चित्र रूपीरांगोळी तयार केल्यामुळे आता जिल्ह्यात चित्राचं कौतुक होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com