National Youth Day 2023 marathi bhashan: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या मुद्दे
भारतात दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस होय. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंदांचे विचार तरुणांना योग्य दिशा देतील यासाठीच त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर करण्यात आला. यासाठी आपण आज मराठी भाषण पाहणार आहोत.
राष्ट्रीय युवा दिन दहा ओळी मराठी भाषण निबंध
स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंद अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी आपल्या विचारांमुळे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. भारत तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील. यासाठी भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला.
छोटेखानी मराठी भाषण निबंध
1984 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 1985 पासून देशभरात दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन, राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. नरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांच्याविषयी अभ्यास केला. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरू श्रीराम कृष्ण परमहंस यांच्याकडून अध्यात्मिक शिक्षण घेतले. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी हिंदुत्त्व आणि त्यांच्या गुरुंच्या विचारांचा जगभर प्रसार केला. स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन जगभरात ओळखली जाते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. त्यांनी केलेली कामे ही युवकांसाठी प्रेरणा देणारी आहेत. 1902 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रीय युवा दिन २०२३ ची थीम विकसित युवक - विकसित भारत
आपल्या देशाती प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीच्या वैश्विक बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेने देशाच्या सर्व भागातील विविध संस्कृतींना एका समान व्यासपीठावर एकत्र आणले जाते.