National Tourism Day 2023 : 'जागतिक पर्यटन दिन'; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व
बऱ्याच लोकांना फिरायला खूप आवडते. मात्र आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे फिरायला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत फिरायला जाण्याचा प्लान केला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांचे कुटुंबिय, जोडीदार आणि मित्रांसह काही वेळ घालवता येईल. सीझननुसार, लोकं फिरण्याचा प्लान आखतात. पर्यटनाचे क्षेत्र हे बहुतेकांच्या रोजगाराचे साधनही आहे. अनेक लोकांची घर पर्यटनावर चालतात. आज 27 सप्टेंबर, म्हणजेच जागतिक पर्यटन दिन. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन वाढावे हा, जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या दिवसाची सुरूवात कशी झाली, त्याचा उद्देश काय आणि यंदाची थीम काय आहे, हे जाणून घेऊया.
कधी झाली जागतिक पर्यटन दिवसाची सुरूवात ?
जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. त्यानंतर 27 सप्टेंबर, 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला.तेव्हापासून दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.
काय आहे जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश ?
पर्यटनाला चालना देणे हा, जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकेल. लोक जेव्हा फिरायला जातात, तेव्हा तेथेच थांबतात, खातात-पितात आणि खरेदीही करतात. यामुळे पर्यटन आणि रोजगारालाही चालना मिळते. पर्यटनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी, दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. लोकांना पर्यटन स्थळांकडे आकर्षित केले जाते.
फिरण्याचे फायदे
आजकाल व्यस्त जीवनामुळे लोकं स्वत:च्या कुटुंबासाठी काय, अगदी स्वत:साठीही थोडाही वेळ काढू शकत नाहीयेत. दररोज तेच-तेच काम करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही दमायला होतं. अशा वेळी एक छोटासा ब्रेक घेऊन फिरायला जाणं खूप महत्वपूर्ण ठरतं.