Mother's Day Google Doodle 2022 : गुगलचं खास डूडल
गुगल (Google) प्रत्येक वेळेस एक स्पेशल डूडल (Doodle) करते. भारतात दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मातृदिन' साजरा केला जातो. हा दिवस आईसाठी खास बनवण्यासाठी कुणी गिफ्ट विकत घेतलं, तर कुणी सरप्राईज प्लॅन करतं. त्याचप्रमाणे सर्च इंजिन गुगल (Search engine Google) देखील खास पद्धतीने 'मदर्स डे' (Mother's day) साजरा करत आहे. गुगलने पुन्हा एकदा आपल्या परिचित शैलीत डूडल बनवून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मदर्स डे निमित्त गुगलने तयार केलेल्या डूडलमध्ये आईबद्दलचे प्रेम, आपुलकी आणि आदराची भावना दिसून येते.
मदर्स डे निमित्त गुगलने चार स्लाइडसह Gif डूडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये एका बाळाचा हात आणि एक आईचा हात दिसत आहे. चार स्लाइडमध्ये हे डूडल तयार करण्यात आले आहे. एका स्लाईडमध्ये मुलाने आईचे बोट धरलेलं आहे. दुसऱ्या स्लाइडमध्ये आई मुलाला ब्रेल लिपी शिकवताना दिसत आहे. तर तिसऱ्या स्लाईडमध्ये आई मुलाला नळाच्या पाण्याखाली हात धुवायला शिकवत आहे. शेवट्या चौथ्या स्लाईडमध्ये आई आणि मूल झाडं लावताना दिसत आहे.
मदर्स डेची सुरुवात अॅना जार्विस (Anna Jarvis) नावाच्या अमेरिकन (American) महिलेने केली होती. अॅनानी तिच्या आईवर खूप प्रेम केले. जेव्हा अॅनाच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा तिने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेऊन तिचे आयुष्य तिच्या आईला समर्पित केले. आईचा सन्मान करण्यासाठी तिनी मातृदिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्या दिवसांत युरोपमध्ये या खास दिवसाला मदरिंग संडे असे म्हणतात.