औरंगाबाद कर्णपुऱ्याची देवी 'माता कर्णिका '
औरंगाबादमधील प्रसिद्ध दवैत स्थान कर्णपुरा देवी बद्दल आज आपण जाऊन घेऊ या. शहरातील छावणी परिसरातील कर्णपुरा देवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहराची ग्रामदेवता म्हणून कर्णिका माता देवीची ओळख आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. राजस्थानातून आलेल्या कर्णसिंग राजाने या मंदिराची उभारणी केली. दानवे कुटुंबांची सातवी पिढी या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत आहे.
राजस्थानचा बिकानेर येथील राजा कर्णसिंग १८३५ मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते. छावणी परिसरातील कर्णपुरा येथे त्याचे वास्तव्य होते. राजा कर्णसिंग राजस्थान येथील कर्णिका मातेचे भक्त होते. या ठिकाणी देखील कर्णिका मातेचे मंदिर बांधायचे त्याने ठरवले. त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली.
राजस्थानी शैलीने हे मंदिर उभारण्यात येते. कालांतराने १९८२मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. कर्णसिंग यांचे या परिसरात २० ते २५ वर्षे वास्तव्य होते. त्यानंतर येथील दानवे कुटुंबाकडे या मंदिराचे पुजारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. दानवे कुंटुबाची सातवी पिढी सध्या मंदिराचे पुजारी म्हणून काम पाहत असल्याची माहिती पुजारी यांनी दिली होती.