गणपती बाप्पासाठी चॉकलेट मोदकाचा प्रसाद बनवा; वाचा रेसिपी
गणेश चतुर्थीचा सण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्रासोबतच देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गणपतीला मोदक अर्पण केले जातात. तुम्हीही घरात आलेल्या बाप्पाला मोदक अर्पण करत असाल तर यावेळी चॉकलेटचे मोदक करून पहा. घरात रोज वेगळा नैवेद्य बनवण्याची परंपरा बनेल व चॉकलेट मोदक ही पूर्णपणे वेगळी रेसिपी असेल. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट वाले मोदक कसे तयार करायचे....
बाजारात गणेशोत्सवात देवाला अर्पण करण्यासाठी विविध प्रकारचे मोदक उपलब्ध होतात. पण आपल्या गणपती बाप्पाला स्वतःच्या हाताने बनवलेले मोदक अर्पण करण्यात जास्त आनंद मिळतो. चॉकलेट मोदक बनवण्यासाठी तुम्हाला एक वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी मैद्याचे पीठ, दोन ते तीन चमचे देशी तूप, चिमूटभर मीठ. चॉकलेट सॉससोबत एक कप खवा, अर्धा कप साखर, अर्धा कप चॉकलेट चिप्स किंवा किसलेले चॉकलेट लागेल.
चॉकलेट मोदक बनवण्यासाठी
कढईत खवा हलका तळून घ्या. नंतर चॉकलेट चिप्स किंवा किसलेले चॉकलेटसह साखर मिसळून ठेवा. आता खव्याने बनवलेले हे मिश्रण बाजूला ठेवा. आणि मोदक बनवायची तयारी करा. मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, मैद्याचे पीठ मिसळा. मग या मिश्रणात देसी तूप टाकून मोहन बनवावे. हे तांदूळ आणि मैद्याचे मिश्रण मळून घ्या. थोडा वेळ सेट होऊ द्या. दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ असेच ठेऊन गोळे करुन घ्या. या गोळ्यांना गोलाकार आकार द्या. आता या आकार दिलेल्या गोळ्यामध्ये चॉकलेट आणि खव्याचे मिश्रण भरा. आणि त्याला मोदकाचा आकार द्या.