Makar Sankranti Fashion Tips: मकर संक्रांतीला लोक काळे कपडे का घालतात? जाणून घ्या
यावर्षी मकर संक्रांती 15 जानेवारी 2023 रोजी साजरी होत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ आणि गुळाचे लाडू दिले जातात आणि काही ठिकाणी पतंगबाजीही केली जाते. यानिमित्ताने कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन सण उत्साहात साजरा करतात. सण खास बनवण्यासाठी महिला स्वतःला सजवतात. तसे, भारतीय रीतिरिवाजानुसार, कोणत्याही हिंदू सणात काळ्या वस्तू वापरण्यास मनाई आहे, परंतु मकर संक्रांतीच्या निमित्ताने बरेच लोक काळे कपडे घालतात. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते. पण हिंदू धर्मात जिथे सणावर काळा रंग अशुभ मानला जातो, तिथे मकर संक्रांतीला काळे कपडे का परिधान केले जातात.
मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात
मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची परंपरा आहे. तसे, ही परंपरा संपूर्ण भारतात नाही. फक्त महाराष्ट्र राज्यात मकर संक्रांतीचा सण साजरा करणारे लोक काळे कपडे घालतात. देशातील उर्वरित शहरांमध्ये रंगीबेरंगी कपडे आणि बहुतांशी पिवळे कपडे घातले जातात.
संक्रांतीला काळे कपडे घालण्याचे कारण
हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो. म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. इतर रंगांच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते. त्यामुळेच या रंगाला मकर संक्रांतीच्या दिवशी प्राधान्य देण्यात आले आहे. म्हणूनच मकर संक्रांतीला लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात.
मकर संक्रांतीला कोणता ड्रेस घालायचा
मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही पारंपरिक कपड्यांमध्ये स्टाईल करू शकता. सलवार कुर्ती, कुर्ता आणि स्कर्ट किंवा साडी घालू शकता. हिवाळ्यातील कुर्तीसोबत पँट किंवा प्लाझो घालू शकता.