मकर संक्रांतीला 'या' मराठमोळ्या शुभेच्छा देऊन वाढवा नात्यातील गोडवा

मकर संक्रांतीला 'या' मराठमोळ्या शुभेच्छा देऊन वाढवा नात्यातील गोडवा

नववर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती. मकर संक्रांत संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
Published on

Makar Sankranti 2024 : नववर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती. मकर संक्रांत संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा 15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना भेटून तिळगूळ वाटप करण्यात येते आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात येतात. मकर संक्रांतीला तुम्हाला नातेवाईकांना, मित्र-मंडळींना डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देऊन सणाचा गोडवा वाढवा.

आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची,

कणभर तीळ, मणभर प्रेम,

गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

म……. मराठमोळा सण

र…… रंगीबिरंगी तिळगुळ

क…… कणखर बाणा

सं…… संगीतमय वातावरण

क्रा…… क्रांतीची मशाल

त …… तळपणारे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

जपू तिळाप्रमाणे स्नेह

वाढवू गुळाप्रमाणे गोडवा

निर्माण करु भेद-भाव मुक्त समाज प्रेरणा !

मकर संक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद

आज संक्रातीचा सण चला करूया साजिरं

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com