माहात्मा गांधी जयंती २०२१; जाणून घ्या इतिहास
राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणार्या माहात्मा गांधींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ला गुजरातच्या पोरबंदर मध्ये झाला.
एप्रिल 1893 मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. तीथल्या २१ वर्षांच्या वास्तव्यात त्यांचे राजकीय विचार विकसित केले. तिथे गांधींना त्यांच्या वर्णामुळे भेदभाव सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेत सुद्धा त्यांनी सामाजीक कार्य केले. 1915 मध्ये गोपाल कृष्ण गोखलेंच्या विनंतीवरून ते भारतात परतले.
गांधीजी काँग्रेसमध्ये सामील झाले आणि गोखल्यांचे उदारमतवादी विचार आत्मसात केले. पुढे त्यांनी समाज सुधारणेत आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले. दांडी यात्रा, असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन हे त्यांचे काही प्रसीद्ध सत्याग्रह आणि आंदोलने आहेत.
अहींसेसाठी जगभर पुजल्या जाणार्या गांधीजींच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने २००७ ला २ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय अहींसा दिवस घोशीत केले आहे.