महाश्वेता चक्रवर्ती: युक्रेन-रशिया युद्धातून 800 जीव वाचवणारी 24 वर्षीय महिला पायलट

महाश्वेता चक्रवर्ती: युक्रेन-रशिया युद्धातून 800 जीव वाचवणारी 24 वर्षीय महिला पायलट

Published by :
Vikrant Shinde
Published on

युक्रेन रशियाच्या युध्दात (Ukraine Russia war) असंख्य नागरीकांचे हकनाक बळी गेले. या युद्धात असंख्य नागरीक वाचले ही, तसेच य़ुक्रेनमध्ये तब्बल 20 हजाराच्यावर भारतीय विद्यार्थी तेथे फसले होते. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा (Operation Ganga) ही मोहिम राबवली. हे विशेष ऑपरेशन पार पाडण्यात सरकारसोबतच धाडसी भारतीय वैमानिकांचे (Pilots) मोठे योगदान आहे.या मोहीमेत महिला पायलट महाश्वेता चक्रवर्ती हीने मोलाची भूमिका बजावत असंख्य भारतीयांना मायदेशी आणले.

24 वर्षाची महाश्वेता हिने युद्धग्रस्त भागात धैर्य आणि समजूतदारपणा दाखवला अणि तेथील युद्धग्रस्त भागात विमान उतरवले अणि तेथून 800 जीव वाचवण्यात यश मिळवले. महाश्वेता यांनी पोलंड-हंगेरी (Poland-Hungary) सीमेवरून ८०० भारतीयांना सुखरूप मायदेशी परतवले. महाश्वेता ही कोलकात्याची रहिवाशी आहे. महाश्वेता बंगाल मधिल भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख तनुजा चक्रवर्तीची मुलगी आहे.

रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. हे युद्ध सुरू झाले होते तेव्हा 18 हजारांहून अधिक भारतीय तिथे अडकले होते. या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केली होती. या अंतर्गत पोलंड, हंगेरी, रोमानिया (Romania) येथे हवाई दलाची विमाने पाठवण्यात आली आणि भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com