यावर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण असणार 'या' तारखेला, जाणून घ्या सविस्तर माहिती
नुकताच सर्वांनी वर्षातील शेवटच्या सूर्य ग्रहणाचा अनुभव घेतला. आता त्या पाठोपाठ आता चंद्र ग्रहणाचा अनुभव घेता येणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला, सूर्यग्रहणाच्या 15 दिवसानंतर म्हणजे देव दिवाळीनंतर हे चंद्रग्रहण दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाशी संबंधित दोन गोष्टी अतिशय खास आहेत, त्या अशा आहेत की, हे चंद्रग्रहण या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल आणि दुसरे म्हणजे त्याचा प्रभाव भारतात पूर्णपणे दिसेल. 2022 वर्षातील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी म्हणजेच कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी होणार असुन, हे चंद्रग्रहण भारतासह दक्षिण/पूर्व युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या भागात देखील दिसेल.
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. अंशतः भारतासह अनेक देशांमध्ये ते पाहण्यास येईल . सकाळी ८.२० पासून सुतक सुरू होईल. या काळात धार्मिक किंवा शुभ कार्य केले जाणार नाही. अनेक राशींवरही त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीवर त्याचा अधिक प्रभाव राहील. या लोकांनी काळजी घ्यावी. त्यांचे आरोग्य, आर्थिक, करिअर आणि व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतात ज्योतिषशासत्रानुसार हे चंद्रग्रहण सर्व जगभरात दुपारी 2:41 वाजता सुरू होईल आणि मोक्ष 6.18 वाजता होईल. तर भारतात ते संध्याकाळी 5.32 ते 6.18 पर्यंत दिसेल.
चंद्रग्रहणाच्या वेळी देवाची पूजा आणि ध्यान करा, अशा प्रकारे देवतांची पूजा करणे शुभ मानले जाते. चंद्रग्रहण काळात काहीही खाणे किंवा पिणे टाळा. या दरम्यान, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे जीवाणू तयार होतात जे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. विशेष म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि दान करणे अधिक शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी लोकशाही मराठी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकशाही कोणताही दावा करत नाही.)