Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला दुध पिण्याची परंपरा का सुरु झाली, काय आहे यामगची कथा जाणून घ्या...

Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला दुध पिण्याची परंपरा का सुरु झाली, काय आहे यामगची कथा जाणून घ्या...

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुध चंद्रप्रकाशात उघड्यावर ठेवले जाते आणि काही वेळाने सर्व लोकांना वाटले जाते. पण कोजागिरी पौर्णिमेला दुध पिण्याची परंपरा का सुरु झाली माहित आहे का? जाणून घ्या...
Published by :
Team Lokshahi
Published on

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खुप जवळ येतो, त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने खुप मोठा दिसतो. या दिवशी चंद्रप्रकाशात खीर तयार केली जाते.

शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते. देवी लक्ष्मी या कोण जागी आहे आणि तिची पूजा करत आहे. पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुधात काजू, बदाम, पिस्ता, साखर, वेलची, केशर आणि जायफळ यांसारखे पदार्थ एकत्रित करून चंद्रप्रकाशात उघड्यावर ठेवले जाते आणि काही वेळाने सर्व लोकांना वाटले जाते. पण कोजागिरी पौर्णिमेला दुध पिण्याची परंपरा का सुरु झाली माहित आहे का? जाणून घ्या...

पौराणिक कथेनुसार या दिवशी राधा आणि गोपींसह भगवान कृष्ण यांनी रास लीला केली होती. म्हणूनच ही रात्र प्रेमाची रात्र म्हणून साजरी केली जाते. तसेच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा कोली जाते असे मानले जाते या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि पौर्णिमेच्या रात्री तिच्या भक्तांना भेट देण्यासाठी आली होती. कोजागिरी पौर्णिमेला कौमुदी म्हणजेच चांदण्यांचा उत्सव म्हणून देखील साजरा केले जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com