Kojagari Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला खेळला जाणारा भोंडला नेमका आहे तरी काय? जाणून घ्या...

Kojagari Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला खेळला जाणारा भोंडला नेमका आहे तरी काय? जाणून घ्या...

कोजागिरी पौर्णिमा यादिवशी देवी लक्ष्मीची विधीनुसार पुजा आणि आराधना केली जाते. अशातच कोजागिरीनिमित्त भोंडला हा एक पारंपारिक खेळ महिलांमध्ये खेळला जातो.
Published by :
Team Lokshahi
Published on

नुकतीच नवरात्र पार पाडली देवीच्या शक्तीपीठांची महती या नवरात्रोत्सवनिमित्त आपण जाणून घेतली नवरात्री झाल्यानंतर येते ती कोजागिरी पौर्णिमा यादिवशी देवी लक्ष्मीची विधीनुसार पुजा आणि आराधना केली जाते. अशातच कोजागिरीनिमित्त भोंडला हा एक पारंपारिक खेळ महिलांमध्ये खेळला जातो. भोंडला खेळाला भुलाबाई किंवा हादगा या नावाने देखील ओळखले जाते. महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा जोपासतात.

मुलींचे पावसाळ्यातील समूह नृत्य असेही या खेळाला म्हटले जाते. हा खेळ खेळताना गाणी आणि फेर संपला की, प्रत्येकजण आजूबाजूला बसेल आणि अंदाज लावण्याचा खेळ खेळेल प्रत्येकाने आणलेल्या खिरापत वस्तूंच्या नावांचा अंदाज लावण्यासाठी आणि मग शेवटी प्रत्येकजण स्वादिष्ट खिरापतचा आनंद घेतात आणि चांगला वेळ घालवतात. आश्विन महिन्यात हस्तनक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून भोंडल्याची सुरुवात होते. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरून मुली आणि महिला भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

या दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक म्हणून मानल्या जाणाऱ्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती महिला फेर धरतात. हत्तीला समृद्धीचे प्रतीक मानला जाते त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. तसेच त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. त्याचसोबत कुमारिका पाटावर डाळ तांदूळ या धान्याने हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात. भोंडला या खेळाचा प्रारंभ एलोपा पैलोमा गणेश देवा... माझा खेह मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी पाखे घुमती नुरजावरी... या गाण्याने केली जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com