Nagpanchami 2024: जाणून घ्या श्रावण महिन्यातील नागपंचमी या पहिल्या सणाबद्दल महत्त्व आणि पूजाविधी

Nagpanchami 2024: जाणून घ्या श्रावण महिन्यातील नागपंचमी या पहिल्या सणाबद्दल महत्त्व आणि पूजाविधी

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

म श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नाग दैवताची पूजा केली जाते. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य कर्मांहून निवृत्त व्हावे. अंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे, अलंकार धारण करावे. पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढावी. त्यांची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करावी. नाग देवताची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.

नागपंचमी सणाचे म्हत्त्व

नागपंचमी बद्दल हिंदू शस्त्रात आणि पुराणातही अनेक कथा आहेत. पण त्यापैकी एका कथेत भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून ते यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित वर आल्याचा दिवस श्रावण शुध्द पंचमी असल्याने नागपूजा प्रचारात आली. कृषीप्रधान भारत देशामध्ये नागपंचमीच्या दिवशी शेतीच्या कामाला सुट्टी देऊन हा सण साजरा करतो. शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही. घरातील गृहिणी देखील भाज्या चिरत नाही. तवा वापरत नाही. घरातच नागाची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा प्रसाद दाखवला जातो. गव्हाची खीर, पुरणाची दिंड किंवा पातोळ्या करण्याची पद्धत आहे.

नागपंचमीचे नियम

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com