कार्तिकी एकादशीनिमित्त सोशल मीडियाद्वारे द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

कार्तिकी एकादशीनिमित्त सोशल मीडियाद्वारे द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात.
Published on

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात. तर, कार्तिकी एकादशीला वारकरी पंढरपूरहून आळंदीस येतात. कार्तिकी एकादशी निमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून खास मराठमोळ्या शुभेच्छा द्या.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|,

कर कटावरी ठेवोनियां||

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

तूझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा

तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा

घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहिन श्रीमुख आवडीने|

कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल|, करावा विठ्ठल जीवभाव||

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी| तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरावा|| बहुत सुकृताची जोडी, म्हणुनि विठ्ठल आवडी| सर्व सुखांचे आगर, बाप रखुमादेवीवर||

कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!!!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com