कपिल देव यांची खळबळजनक भविष्यवाणी; म्हणाले, विश्वचषकाच्या सेमीफायनलपर्यंत भारत पोहोचणार नाही!
मागच्या रविवारपासून ऑस्ट्रेलियामध्ये T20 विश्वचषक 2022ला सुरवात झाली आहे. दरम्यान, मागील काही सामन्यांपासून भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. मात्र, T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जोरदार तयारीत असताना भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघाबाबत खळबळजनक विधान केले आहे.
काय म्हणाले कपिल देव?
सुरेश रैना सचिन तेंडलकर या माजी खेळाडूंकडे विश्वचषक जिंकण्याची ताकद आहे. आमच्या काळात सगळेचं प्लेअर ऑलराऊडर असायचे तसेच टीम इंडियामध्ये हार्दीक पांड्या हा फक्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. विश्वचषक स्पर्धेत दाखल झालेल्या इतर टीम सुद्धा चांगल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया 30 टक्के सेमी फायनलमध्ये पोहोचेल अशी खळबळजनक भविष्यवाणी माजी कपिल देव यांनी केली आहे.
येत्या रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे दोन्ही देशाचे लक्ष लागले आहे. जगभरातील क्रिकेटचे चाहते त्या मॅचची वाट पाहत आहेत.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.