‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ का साजरा होतो? जाणून घ्या!

‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ का साजरा होतो? जाणून घ्या!

Published by :
Published on

'आंतरराष्ट्रीय युवा दिन' ही जागतिक पातळीवर विविध उपक्रमांद्वारे युवकांचा आवाज जगभरात पोहोचवण्याची एक संधी आहे. 12 ऑगस्टला जगभरात 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' साजरा केला जातो. यानिमित्ताने दरवर्षी युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते.

दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने युवकांशी निगडीत असणाऱ्या अनेक मुद्द्यांवर, घटकांवर आणि भविष्यातील आव्हांनावर चर्चा घडवून आणली जाते. आजची तरुण पिढी ही ज्ञान, विज्ञाना, तंत्रज्ञान आणि प्रयोगाच्या विश्वात वावरणारा आहे. विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे.

शिवाय त्याविषयीची मागणी करण्यासाठी ही पिढी सतत सक्रिय असते. युवकांच्या या क्षमतेला आंतरराष्ट्रीय व्यासपिठाची जोड देऊन बदल नक्कीच घडवता येईल. म्हणून जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्यादिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे. 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' का साजरा केला जातो? : 17 ऑगस्ट 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय युवा दिवस 12 ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय युवा दिवस सर्वात पहिल्यांदा 2000 मध्ये आयोजित करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचा मुख्य उद्देश हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर तरुणांचा सहभाग आणि भूमिका यावर चर्चा करणे आहे.

'आंतरराष्ट्रीय युवा दिन' कसा साजरा केला जातो? : दरवर्षी या दिवशी संयुक्त राष्ट्र एक थीम निवडते. या थीमनुसार, जगभरातील युवकांसाठी युवकांद्वारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध माध्यमांद्वारे जगभरातील तरुणांशी संवाद साधला जातो.काय आहे २०२१ च्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाची थीम? : प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्र सर्व जागतिक समुदाय आणि नागरिकांसाठी संबंधित थीम ठरवते. आंतरराष्ट्रीय युवा दिवसाची या वर्षीची थीम "ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टम्स: युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ" ही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com