International Yoga Day 2022 : जाणून घ्या योग दिनाची थीम आणि इतिहास काय आहे

International Yoga Day 2022 : जाणून घ्या योग दिनाची थीम आणि इतिहास काय आहे

दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो
Published by :
shweta walge
Published on

दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन (International Yoga Day) म्हणून साजरा केला जातो. ज्यामुळे लोकांना योगाचे महत्त्व कळावे आणि योग संपूर्ण जगापर्यंत पोहोचावा. यंदा मंगळवार, २१ जून रोजी आठवा जागतिक योग दिन साजरा केला जाणार आहे. योग दिनाच्या दिवशी जगभरातील लोक जमतात आणि ठिकठिकाणी योग दिन साजरा करतात. योगामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे.

जागतिक योग दिनाचा इतिहास

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 2014 साली जागतिक योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. 11 डिसेंबर 2014 रोजी दरवर्षी 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

योगाचे महत्त्व

योगासने केल्याने शरीर निरोगी राहते. योगाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. रोज योगासने केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार दूर राहतात. वाढता ताणतणाव आणि जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर योगासने मात करता येते. योगासने केल्याने शरीर मजबूत होते. योगामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते.

International Yoga Day 2022 : जाणून घ्या योग दिनाची थीम आणि इतिहास काय आहे
आज काय घडले : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनची निर्मिती पूर्ण

जागतिक योग दिन 2022 ची थीम

आयुष मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी 'योगा फॉर ह्युमॅनिटी' (Yoga for Humanity) ही थीम निवडण्यात आली आहे. ज्याचा अर्थ मानवतेसाठी योग. हीच थीम लक्षात घेऊन यावर्षी जगभरात योग दिन साजरा केला जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com