International Mens Day
International Mens DayTeam Lokshahi

International Mens Day : 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन'; काय आहे या दिनाचं महत्त्व? वाचा काय आहे इतिहास

International Men’s Day 2022- या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिन देखील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास आणि हेतू जाणून घेऊया.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मात्र, ज्या उत्साहाने आणि पाठिंब्याने महिला दिन साजरा केला जातो, तसा उत्साह आणि क्रेझ पुरुष दिनाबाबत मात्र दिसत नाही. हा दिवस प्रामुख्याने पुरुषांना भेदभाव, शोषण, अत्याचार, हिंसा आणि असमानता यापासून वाचवण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. तसेच 19 नोव्हेंबर रोजी 80 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो आणि त्याला युनेस्कोचाही पाठिंबा आहे. प्रत्येक वर्षी या दिनानिमित्त एक खास थीमही ठेवली जाते.

International Mens Day
Drishyam 2 Review : शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स

पुरुष दिवस 2022 थीम

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022 ची थीम ''Helping Men and Boys''

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास

1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. 19 नोव्हेंबर 2007 रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व

आंतरराष्‍ट्रीय पुरूष दिन साजरा करण्‍याचा मुख्‍य उद्देश हा आहे की, पुरूषांचे संघर्ष आणि ते वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती समाजाला होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी, पुरुषांवरील भेदभावाबद्दल देखील बोलले जाते आणि चांगले लैंगिक संबंध निर्माण करण्याचे आश्वासन दिले जाते. पुरुषांचीही समाजात आणि कुटुंबात वेगळी ओळख असते. त्यांच्या योगदानाचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com