रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ, पाहा आजचे दर
एमसीएक्स (MCX) वर सोन्याची (Gold) किंमत 0.57 टक्कांनी वाढून 52,067 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोबतच चांदीच्या (Silver) किंमतीत 0.51 टक्कांनी वाढून 68,247 रुपये प्रती किलोग्रँम झाली आहे.
रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukrain) युध्द अधिक तीव्र झाले आहे. या युध्दाला आता आठ दिवस झाले आहेत. युध्दाच्या तीव्रतेमुळे मौलवान धातुच्या किंमतीत वाढ होत आहे. जर तुम्ही दागिने खरेदी करायचा विचार करत आहात तर त्यांचे किंमत जाणून घ्या.
एकीकडे सोन्याच्या दरात वाढ सुरु असतानाच चांदीचे दरात वाढ होत आहे. चांदीची किंमत 68 हजारापेक्षा जास्त झाला आहे. आज चांदीच्या किंमतत 0.51 टक्कांनी वाढून चांदीचा भाव वाढून 68247 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतत जोरदार वाढ झाली.
सोन्याची शुध्दता कशी ओळखावी
२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे. पण पूर्ण २४ कॅरेट (Carat) सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळलेला असतो. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क (Hall Mark) बनवले जाते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले असते. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत देशभर बदलते.