Importance Of Shravan : श्रावण महिन्यात शंकराची पूजा का करतात?
श्रावण (Shravan) महिन्याला सुरुवात होत आहे. पावसाळ्यात येणाऱ्या या श्रावणाचे धार्मिकदृष्ट्या अनोखे महत्व आहे. मराठी श्रावण महिना म्हटलं की, सर्व सणांचा राजा मानला जातो. या महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवर भ्रमण करतात. या महिन्यात महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळते. श्रावणातील सोमवारचे विशेष महत्व असते. या महिन्यात सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते. उपवर(लग्न न झालेल्या) मुलीने या महिन्यात सोमवारचे व्रत ठेवल्यास मुलीला इच्छित वर मिळतो. चला जाणून घेऊ या श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व, पूजा विधी, महादेवाच्या पिंडीवर जल चढवण्याची शुभ वेळ या विषयी.
शास्त्रामध्ये श्रावणाचे खूप महत्व आहे. भगवान विष्णू निद्रा अवस्थेत गेल्यानन्तर महादेव पृथ्वीवर येतात. या महिन्यात महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक केल्याने जीवनात येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळते. श्रावणातील सोमवारचे विशेष महत्व असते.
श्रावणातील शिवरात्रीत भगवान महादेवाची विशेष पूजा केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी सोमवार आल्यास या दिवशी महादेवाकडून विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. या महिन्यातील सोमवारचे अधिक महत्व असते. सोमवार हा महादेवाचा वार म्हणून ओळखला जातो. या दिवशी महादेवाच्या पिंडीला अभिषेक केल्यास सुख समृद्धी आणि समाधान प्राप्त होते.
श्रावणातील पूजाविधी :-
१. श्रावण महिन्यात पूजा करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठले पाहिजे. यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे धारण केले पाहिजे.
२. यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन पांढरे फुल, अक्षता, चंदन, धोतऱ्याचे फुल चढवले पाहिजे.
३. यानंतर तांब्यातील पाण्याने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला पाहिजे.
४. जल चढविल्यानंतर महादेवाची आरती करा.