तब्बल 85 दिवस लढले; मृत्यूवर केली मात!
देशात कोरोना आणि ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. यामध्ये अनेकांना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली आहेत. उपचारादरम्यान काही जणांचा मृत्यू झाला आहे. असं असताना एक सकारात्मक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कोरोना, ब्लॅक फंगस, ऑर्गन फेलसह इतर आजारांविरोधातील लढाई ते यशस्वीरित्या जिंकली आहे. तब्बल 85 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी गंभीर आजारावर मात केली आहे. भरत पांचाळ असं या 54 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते मुंबईचे रहिवासी आहेत. तीन महिन्यांनंतर त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पांचाळ यांनी कोरोना, ब्लॅक फंगसची लागण झाली होता. तसेच त्याचे ऑर्गन देखील फेल झाले होते. कोरोना संक्रमणामुळे त्यांची किडनी, लिव्हर आणि फुफ्फुस काम करायचं बंद झाले होते.
मल्टी ऑर्गन फेल्यूअर आणि ब्लॅक फंगसचा देखील त्यांना सामना करावा लागला. जवळपास 70 दिवस ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. डॉक्टरांनी गेल्या 15 दिवसांत इतक्या गंभीर समस्या असलेला पहिला रुग्णा पाहिल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर रेमडेसिवीरपासून प्लाझ्मा थेरपी आणि इतरही उपचार केला मात्र त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. डॉक्टरांची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतर भरत पांचाळ हे बरे झाले आहेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे आणि तब्बल 85 दिवसांनी त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.