‘या’ पाच गोष्टी आहेत आपल्या चेहऱ्यासाठी लाभदायक, चेहऱ्याची रंगत कायम ठेवण्यासाठी करा डाइटमध्ये समावेश
आजकाल सर्वांनाच त्वचेच्या वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. मग त्यासाठी काहीजण डॉक्टरांचा सल्ला घेतात. काहींना डॉक्टरांचा सल्लाच्या फायदा होतो तर काहींना त्याचा फायदा होत नाही.
आपल्यातील बहुतेक माणसे अशी असतात की, ज्यांचे शरीर तर तरुण वाटते पण त्यांच्या चेहऱ्यावरची चमक कमी झालेली असते.
थंडीत चेहऱ्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्याला या समस्यांना दूर करायचे असेल तर डाइटमध्ये या गोष्टींचा समावेश करायला हवा.
दही
दही हा पदार्थ थंड असून चेहऱ्यासाठी खूप उपयोगाचा आहे. दह्यापासून बनवलेले रायते किंवा लस्सी या गोष्टी चेहऱ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आपण दह्याला तांदळाच्या पिठात किंवा बेसनमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होवू शकतात.
लिंबू-
लिंबाचा रस आपल्या पोटासाठी नव्हे तर त्वचेसाठी सुध्दा खूप उपयोगी आहे. रोज लिंबूपाणी प्यायल्याने पोट्याच्या संबधी असलेले विकार दूर होतात. त्यासोबतच लिंबाच्या रसाला साध्या पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावू शकतो.
टरबूज-
बहुतेक जणांना टरबूज हे फळ खूप आवडते. या फळाचे फायदे देखील खूप आहेत. टरबूज
खाण्यासोबतच त्याचा रस देखील आपण चेहऱ्यावर लावू शकतो. त्यामुळे चेहऱ्या चमकदार बनतो.
दूध-
आपल्या सर्वांना माहितच असेल की, दूधाला पूर्णआहार असे म्हटले जाते. आपल्याला कमीत कमी दोन ग्लास दूध प्यायला हवे. आपण सकाळी आणि रात्री एक ग्लास दूध प्यायला हवे. आपण चेहऱ्यावर कच्चे दूध पण लावू शकतो त्यामुळे चेहरा तजेलदार बनतो.
सफरचंद-
आपल्या आहारात आपल्याला रोज एका सफरचंदाचा समावेश करायला हवा. याच्यासोबतच सफरचंदाचा रस काढून चेहऱ्यावर लावू शकतो. हा सफरचंदाचा रस चेहऱ्यासाठी गुणकारी आहे.