Video | ८ मार्च या दिवसाचं महत्त्व काय आणि महिला दिन का साजरा केला जातो?

Video | ८ मार्च या दिवसाचं महत्त्व काय आणि महिला दिन का साजरा केला जातो?

Published by :
Team Lokshahi
Published on

८ मार्च रोजी महिला दिन (Women's Day ) साजरा केला जातो. आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले आहे. महिलांचे हक्क आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला (World Women's Day) विशेष महत्त्व आहे. ८ मार्च या दिवसाचं महत्त्व काय आणि महिला दिन का साजरा केला जातो?

आपण महिला दिवस साजरा करतो पण तो दिवस का साजरा करतो ह्या मागे काय कारण आहे, हे अजूनही अनेकांना माहित नाही. महिला दिन याचं महत्त्व काय ते समजून घेणे गरजेचे आहे. तर चला जाणून घेऊ यामागील इतिहास.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळ संपूर्ण जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकामध्ये सुरूवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारला होता. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपल्या परीने प्रयत्न करीत असत.1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' ची स्थापन केली.

परंतु असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. 8 मार्च 1908 रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली असून दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षिता हवी अशी मागणी केली. या दोन मागण्यांनंतर लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशा प्रकारच्या मागण्याही केल्या.

8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या सामर्थ्यासाठी 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारायला हवा हा प्रस्ताव क्लारा यांनी मांडलेला होता आणि तो ठराव पासही झाला.

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. तर 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला आणि पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर करण्यात आले. तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले. आता बँका, कार्यालयांमध्ये 8 मार्च हा दिवस साजरा केला जातो. 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. तसेच जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com