Guru Tegh Bahadur Jayanti| जाणून घ्या, शिखांचे नववे गुरु तेग बहादूर सिंग यांचा इतिहास

Guru Tegh Bahadur Jayanti| जाणून घ्या, शिखांचे नववे गुरु तेग बहादूर सिंग यांचा इतिहास

Published by :
Team Lokshahi
Published on

गुरु तेग बहादुर सिंग (Guru Tegh Bahadur Singh) हे शिखांचे नववे गुरु Ninth Guru of Sikhs आहेत.  आज (1April रोजी ) त्यांची जयंती साजरी केली जाते. जगाच्या इतिहासात धर्म, मानवी मूल्य, आदर्श आणि प्राणांची आहुती दिली. शिख धर्मामध्ये त्यांच्या बलिदानाचा खूप आदर आहे. गुरु तेग बहादुर सिंग यांचा जन्म वैशाख कृष्ण पंचमीला पंजाबमधील अमृतसर (Amritsar) येथे झाला होता. गुरु तेग बहादुर सिंग यांचा लहानपणीचे नाव त्यागमल (Tyagmal) असे होते.

गुरु तेग बहादुर सिंग यांनी वयाच्या 14 वर्षी वडिलांसोबत मुघलांविरुध्द (Mughals) युध्द केले. काश्मीरमध्ये (Kashmir) हिंदूंना बळजबरीने मुस्लिम बनवण्यास प्रयत्न सुरु होते. पण गुरु तेग बहादुर सिंग यांचा तीव्र विरोध होता आणि त्यांनी स्वतः इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला होता. औरंगजेबाच्या (Aurangzeb) आदेशावरून 24 नोव्हेबर 1675 रोजी जमावासमोर त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव त्यागमल ठेवले, परंतु मुघलांविरुद्धच्या युद्धात त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे ते तेग बहादूर म्हणून प्रसिद्ध झाले. तेग बहादूर म्हणजे तलवारीचा धनी. दिल्लीतील (Delhi ) प्रसिद्ध गुरुद्वारा शीश गंज साहिब (Gurudwara Sheesh Ganj Sahib) येथिल ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचा शेवटचा निरोपही येथूनच झाला. आज ते ठिकाण रकाबगंज साहिब (Rakabganj Sahib) म्हणून ओळखले जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com