Gudipadwa Wishes: गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा
गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण आहे. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आहे. गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही हे खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकतात.
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!