Gandhi Jayanti 2024: महात्मा गांधी यांच्या जयंतनिमित्त जाणून घ्या महात्मा गांधी यांनी समाजाला दिलेले त्याच्या विचारांचे बोध
राष्ट्रपिता म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा महात्मा गांधी यांची जयंत २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. संपुर्ण जगभरात महात्मा गांधींची जयंती आदर- सन्मानाने साजरी केली जाते. महात्मा गांधी यांचे संपुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे हे आहे. महात्मा गांधींना अनेक नावांनी ओळखले जाते ज्यामध्ये महात्मा गांधी, बापू, राष्ट्रपिता ही नावे आहेत. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी अहिंसा, सविनय कायदेभंग व सत्य हे तत्त्व सामर्थ्यवान साधने म्हणून वापरणाऱ्या गांधीजींना श्रद्धांजली देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरातमधील पोरबंदर याठिकाणी झाला. त्यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टर म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले. "रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम" महात्मा गांधींचे हे बोल आपल्याला माहित आहेत. याव्यतिरिक्त महात्मा गांधींनी समाजला अनेक विचार प्रदान केले. गांधीजींनी दिलेल्या विचारांचा आपल्यया जीवनात आपण अवलंब केला तर असंख्य समस्यांना सहज सामोरे जाऊ शकता.
महात्मा गांधींनी समाजाला दिलेले बोध
1. अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
2. चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.
3. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे.
4. आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.
5. तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.