Online Education | ”मोदी जी नेटवर्क फक्त डोंगरावर येते”,फोपसंडी गावच्या तुषारचे थेट पंतप्राधानांना पत्र

Online Education | ”मोदी जी नेटवर्क फक्त डोंगरावर येते”,फोपसंडी गावच्या तुषारचे थेट पंतप्राधानांना पत्र

Published by :
Published on

आदेश वाकळे | कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला होता, मात्र राज्यातील असंख्य दुर्गम भागात वीज व मोबाईल नेटवर्क अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण आधारात चालले आहे. काही विद्यार्थी तर नेटवर्कसाठी डोंगरावर जाऊन ऑनलाईन अभ्यास करत आहेत. अशाच अकोले तालुक्यातल्या तुषारने मुठेने घराजवळ मोबाईल नेटवर्क मिळावे यासाठी थेट पंतप्राधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

ऑनलाईन शिक्षण म्हटलं तर अतिदुर्गम भागात अशक्यप्रायच म्हणा. कारण या भागात विजेच्या व नेतवर्कच्या मोठ्या समस्येपासून ते झुजतच असतात. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील फोपसंडी गावचा १३ वर्षीय तुषार मुठे सध्या अशाच समस्येपासून झुजत आहे.

सातवीत शिकत असलेला तुषार मुठे सध्या ऑनलाईन शिक्षणासाठी नेटवर्क सुविधा नसल्याने डोंगरारील रोडच्या मोरीत जाऊन ऑनलाईन शिक्षण घेत आहे. फोपसंडी गावात नेटवर्क नसल्याने त्याला ही मोठी कसरत करावी लागत आहे. तुषार मुठे या विद्यार्थ्यांला स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हाधिकारी व्हायचे आहे. मात्र गावातील या समस्येमुळे त्याच प्राथमिक शिक्षणचं अडचणीत आले आहेत.

दरम्यान तुषार मुठे याने या संदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. मोबाईल टॉवर , शिक्षण व वैद्यकीय सुविधा या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या व गावच्या व्यथा त्याने मांडल्या आहेत. गावात ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध होईल या आशेवर तुषार आपले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com