Father's Day : 'फादर्स डे' कधी आहे? वाचा 'या' दिनाचा इतिहास आणि महत्त्व
फादर्स डे अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. वडील आणि मुलांचे नाते हे खूप वेगळे असते. फादर्स डे हा आपल्या जीवनातील वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या वडिलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी 'फादर्स डे' हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात. 'फादर्स डे' ची मूळ कल्पना अमेरिकेची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1910 मध्ये सुरु झालेल्या 'मदर्स डे' पासून मिळाली.
अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी 1966 मध्ये अधिकृतपणे जूनचा तिसरा रविवार फादर्स डे म्हणून घोषित करण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. त्यानुसार, 19 जून हा फादर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.
आपले वडील आपल्यासाठी किती खास आहेत त्याची जाणीव मुलं त्यांना या गोष्टींमधून करुन देतात. ब-याचदा मुलं जितकी आपल्या आईविषयी असणारे प्रेम मोकळेपणाने व्यक्त करतात तेवढे बाबांविषयी असणारे प्रेम व्यक्त करत नाही.