Fathers Day 2023 : 'फादर्स डे'ला 'या' खास शुभेच्छा देऊन करा साजरा
Fathers Day 2023 : फादर्स डे अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. वडील आणि मुलांचे नाते हे खूप वेगळे असते. फादर्स डे हा आपल्या जीवनातील वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या वडिलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी 'फादर्स डे' हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी तुमच्या सोशल मीडिया स्टेटसला या खास शुभेच्छा ठेवून वडिलांना स्पेशल फिल द्या.
प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो
हॅप्पी फादर्स डे
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
हॅप्पी फादर्स डे
बाप म्हणजे कोण असतं?
हरवलेल्या पाखराचं छत्र
अन् बिथरलेल्या आवाजाचं
पत्रं असतं..!!
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस
वडिलांमुळेच असतो
हॅप्पी फादर्स डे
मला सावलीत बसून,
स्वतः जळत राहिले.
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिले.
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा