Father's Day Special Cake Recipe: 'फादर्स डे' निमित्त घरच्या घरी केक बनवून बाबांना द्या खास सरप्राईज; जाणून घ्या रेसिपी...
दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा होत असलेला फादर्स डे, यावर्षी 16 जुन रोजी साजरा केला जाणार आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी ढाल बनणाऱ्या प्रत्येक वडिलांना हा दिवस समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी खास केक बनवून त्यांना सरप्राईज देऊ शकता.
1. चॉकलेट केक
तुमच्या वडिलांसाठी तुम्ही चॉकलेट केक देखील सर्व्ह करू शकता. अगदी मोजक्या साहित्यात हा केक बनतो.
चॉकलेट केकसाठी लागणारे साहित्य:
1 कप मैदा
1 कप पिठी साखर
½ कप कोको पावडर
1 चमचा बेकिंग पावडर
1 चमचा बेकिंग सोडा
½ चमचा मीठ
½ कप तेल
½ कप गरम पाणी
½ कप दूध
1 चमचा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
2 चमचे दही
चॉकलेट केक बनवण्याची पद्धत:
फादर्स डे सेलिब्रेशनसाठी चॉकलेट केक बनवायचा असेल तर सर्वप्रथम, ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहिट करा आणि ट्रे ला व्हेजिटेबल ऑईल लाऊन ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ मिक्स करा. त्यानंतर आणखीन एका भांड्यात साखर आणि तेल घालून चांगले फेटून घ्या. साखर आणि तेल पद्धतशीर फेटून झाल्यानंतर मैदाचे मिश्रण त्यात एकत्र करा. वरून दूध आणि व्हॅनिला इसेन्स मिक्स करा.त्यानंतर सर्वात शेवटी दही मिक्स करा.
हे सर्व मिश्रण नीट मिक्स झाल्यावर प्रीहीट केलेल्या ट्रे मध्ये ओतून 25 मिनिटेपर्यंत ओव्हनमध्ये ठेवा. त्यानंतर केक बेक झाला आहे की यही हे टूथपिक घालून तपासून घ्या, शेवटी तयार झाल्यानंतर बाहेर काढून अर्धा तास थंड होण्यासाथी बाजूला ठेवा. अशाप्रकारे चॉकलेट केक तयार. यात आपण सजावटीसाठी चोको चिप्स मिक्स करू शकता.
2. मँगो-रवा केक
अगदी मोजक्या साहित्याचा वापर करून तुम्ही मँगो-रवा केक बनवू शकता.
मँगो-रवा केकसाठी लागणारे साहित्य:
1 कप बारीक रवा
1/4 कप मैदा
1/2 कप पिठीसाखर
1/2 कप तूप
1 कप आंब्याचं पल्प
चवीनुसार मीठ
1/2 टीस्पून बेकिंग पावडर
1/4 टीस्पून बेकिंग सोडा
मँगो-रवा केक बनवण्याची पद्धत:
एक भांड्यात रवा, मैदा, पिठीसाखर, तूप घाला. आंब्याचा पल्प घालून सर्व एकजीव करा आणि 15 मिनिटे झाकून बाजूला ठेवा. 15 मिनिटानंतर मायक्रोवेव्ह 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटे गरम करायला ठेवा. दुसरीकडे रव्याच्या मिश्रणात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालून मिक्स करा. केकटीनला तूप लावून घ्या तळाला परचमेन्ट पेपर लावून घ्या. आता तयार मिश्रण केकटिनमध्ये ओतून टॅप करा वरून ड्रायफ्रूट्सचे तुकडे घाला. प्रिहिट मायक्रोवेव्हमध्ये ठेवून 30-35 मिनिटे बेक करा. बेक झाल्यावर काढून रॅकवर थंड होण्यास ठेवा, कापून सर्व्ह करा.