आठ वर्षाच्या हिरकणीने गाठले 'एव्हरेस्ट बेस कॅम्प'

आठ वर्षाच्या हिरकणीने गाठले 'एव्हरेस्ट बेस कॅम्प'

सुकन्या गृहिता (वय ८) हिने माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण प्रवास पूर्ण केला.
Published by :
shweta walge
Published on

लक्ष्मीकांत घोणसे-पाटील, रत्नागिरी: गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवासी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्याला असणारे सचिन गंगाधर विचारे यांची सुकन्या गृहिता (वय ८) हिने माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा जगातील सर्वात उंच कठीणात कठीण ट्रेक पूर्ण केला. मात्र, तब्बेत बिघडल्याने तिला अर्ध्यावरुनच माघारी यावे लागले. छोट्याच् चे कौतुक करण्यात येत आहे.

माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठताना आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी जी आव्हाने तिच्यासमोर होती ती म्हणजे, सरळ चढ असलेलीशिखर सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ, थंडगार वारा, गोठलेले पाणी,ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी, कुठेही शेवट न दिसणारी अशी अंतहीन चढाई आणि आव्हानात्मक हवामानातील बदलांना तोंड द्यावे लागले. या अनुभवानंतर भल्याभल्यांनाही घाम फुटतो; पण गृहिता विचारे हिने काहीही झाले तरी ते उंच टोक गाठायचे अशी जिद्द उराशी बाळगली होती. या जिद्दीच्या जोरावर वडील सचिन विचारे यांच्यासोबत ती उंची गाठण्यात यश संपादन केले.

१३ दिवसांचा हा ट्रेक, जो काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून १४०० मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत ४ तासांचा आहे.

हरिता सुद्धा ट्रेकचा एक भाग होती. पण टिंगबोच्या (३८६० मीटर) पुढे ती जाऊ शकली नाही. कारण तिला जास्त उंचीच्या आजाराचा सामना करावा लागला. त्यामुळे पुढील औषधांसाठी तिला कमी उंचीवरून परत यावे लागले. मात्र आता ती पूर्णपणे ठिक आहे. सचिन विचारे आणि त्यांची सुकन्या गृहिता माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचली होती. त्यांनी आता परतीचा प्रवास सुरू केला आहे.

आठ वर्षाच्या हिरकणीने गाठले 'एव्हरेस्ट बेस कॅम्प'
Goa Tourism Rules: गोव्यातील पर्यटकांवर हे निर्बंध, भेट देणार असाल तर जाणून घ्या नियम

असा होता प्रवास

रामेछाप ते लुक्ला विमानाने प्रवास (समुद्र सपाटीपासून २८४३ मीटर उंचीवर). वास्तविक हा ट्रेक १४८ किलोमीटरचा आहे. लुक्ला (समुद्र सपाटीपासून २८४३ मीटर उंच), फाकडिंग (२६१० मीटर उंच), नामचे बाजार (३४४० मीटर), टिंगबोचे (३८६० मीटर), डिगबोचे (४४१० मीटर), लोबुचे (४९१० मीटर), गोरक्षेप (५१४० मीटर), कालापथर (५५५० मीटर) आणि अखेरीस मानाचा रुरा म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) असा हा प्रवास होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com