भाऊबीजेला 'या' शुभेच्छा देऊन प्रियजनांचा आनंद करा द्विगुणीत
Bhaubeej 2023 : भाऊ-बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीज हा बहिण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. भाऊबीजनिमित्त सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा शेअर करा.
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे!
भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडीही माया…. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!