आज काय घडले : मुंबई शेअर बाजाराची सुरुवात
सुविचार
यश हे सोपे असते. कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन असते. कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
आज काय घडले
१८७३ मध्ये मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. आज मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य २ लाख १८ हजार दक्षलक्ष रुपयांपेक्षा जास्त आहे.
१९४४ मध्ये ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
१९५१ मध्ये भारतातील पहिली पंचवार्षिक योजनेला सुरुवात करण्यात आली.
१९६९ मध्ये राष्ट्रीय वन्यजीव विभागातर्फे वाघाला भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला.
२०११ मध्ये सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती करण्यात आली. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
आज यांचा जन्म
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि जनसंघाचे पहिले सरचिटणीस रामभाऊ म्हाळगी यांचा १९२१ मध्ये जन्म झाला. भाजपचे विधानसभेतील ते पहिले आमदार होते.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा १९२५ मध्ये जन्म झाला. १९५० ते १९६० च्या दशकात त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली.
भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा १९३० मध्ये जन्म झाला.
संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेते हरी जरीवाला यांचा १९३८ मध्ये जन्म झाला. १९६० सालातील हम हिंदुस्तानी या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
आज यांची पुण्यतिथी
भारतीय महाराष्ट्रीयन तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ञ सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. हा. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे १९६८ मध्ये निधन झाले.
माजी नगरविकासमंत्री व लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचे २००५ मध्ये निधन झाले.