आज काय घडले : स्वातंत्र्यवीर सावरकरांची समुद्रात उडी
सुविचार
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की, तुम्ही किती असामान्य आहात.
आज काय घडले
१४९७ मध्ये वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला. आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग त्यांनी शोधला.
१९१० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘मोरिया’ या जहाजातून फ्रान्समधील मॉर्सेलिसच्या समुद्रात उडी घेतली. मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. पण भाषेच्या अडचणीमुळे त्यांना पुन्हा अटक झाली.
२००६ मध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला.
२०११ साली भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी तयार करण्यात आली.
आज यांचा जन्म
मराठ्यांचा आद्य इतिहासकार जेम्स ग्रँट डफ १७८९ मध्ये जन्म झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या मराठ्यांचा इतिहास लिहिला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य, पश्चिम बंगाल राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले ज्योती बसू यांचा १९१४ मध्ये जन्म झाला. ते १९७७ पासून २००० पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा १९१६ मध्ये जन्म झाला. अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत म्हणून त्यांची ओळख होती.
आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा १९४९ मध्ये जन्म झाला.
बॉलीवूड अभिनेत्री नीतू सिंग यांचा १९५८ मध्ये जन्म झाला. बाल-कलाकार म्हणून काम केल्यानंतर नीतू सिंग यांनी ६० पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या.
भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा १९७२ मध्ये जन्म झाला. भारताकडून सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा सौरव गांगुली यांनी काढल्या आहेत.
आज यांची पुण्यतिथी
मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे बा.भ. बोरकर उर्फ बाकीबाब बोरकर यांचे १९८४ मध्ये निधन झाले. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे १९९४ मध्ये निधन झाले.
प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे २००१ मध्ये निधन झाले.
संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे २००३ मध्ये निधन झाले.
भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांचे २००७ मध्ये निधन झाले. १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान ते पंतप्रधान होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे २००८ मध्ये निधन झाले.