Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : भारत-श्रीलंका शांती करार

अनुप जलोटा यांचा जन्म, सुधीर फडके यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

सुविचार

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

आज काय घडले

  • १९२० मध्ये जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.

  • १९४८ मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे बंद असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुमारे १२ वर्षानंतर लंडनमध्ये सुरुवात झाली.

  • १९५७ मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची स्थापना करण्यात आली. १५१ पेक्षा जास्त देश या संस्थेचे सदस्य आहेत.

  • १९८७ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांती करारावर हस्ताक्षर केले.

Dinvishesh
आज काय घडले : चौधरी चरणसिंह झाले पंतप्रधान

आज यांचा जन्म

  • भारतीय उद्योजगत पितामहा जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा १९०४ मध्ये जन्म झाला. ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.

  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित साहित्यकार व इतिहास लेखक बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा १९२२ मध्ये जन्म झाला.

  • मराठी व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस यांचा १९२५ मध्ये जन्म झाला. त्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या.

  • भजन सम्राट म्हणून लोकप्रिय असलेले प्रसिद्ध भारतीय भावगीत व भजन गायक आणि संगीतकार अनुप जलोटा यांचा १९५३ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक व चित्रपट निर्माता संजय दत्त यांचा १९५९ मध्ये जन्म झाला. त्यांच्या जीवनावर 'संजू" नावाचा चित्रपट निघाला आहे.

Dinvishesh
आज काय घडले : राज्यात तंबाखू, गुटखाच्या जाहिरातींना बंदी

आज यांची पुण्यतिथी

  • भारतीय बंगाली समाजसुधारक, तत्वज्ञानी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे १८११ मध्ये निधन झाले.

  • शिक्षणतज्ज्ञ व स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे १९९६ मध्ये निधन झाले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांच्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.

  • महाराष्ट्रीयन मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे २००२ मध्ये निधन झाले.

  • भारतीय हिंदी चित्रपट हास्य कलाकार व अभिनेते बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर यांचे २००३ मध्ये निधन झाले.

  • मराठी संत साहित्याचे विद्वान व गाढे अभ्यासक डॉ. निर्मल कुमार फडकुले यांचे २००६ मध्ये निधन झाले.

  • जयपूरचे महाराज सवाई मानसिंग यांच्या पत्नी व जयपूर राज्याच्या तिसऱ्या महाराणी महाराणी गायत्रीदेवी यांचे २००९ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com