Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : चौधरी चरणसिंह झाले पंतप्रधान

डॉ. अशोक शेखर गांगुली यांचा जन्म, महाश्वेतादेवी यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

सुविचार

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

आज काय घडले

  • १८२१ मध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील पेरू या देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९३४ मध्ये पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.

  • १९७९ मध्ये चौधरी चरण सिंह यांनी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून सूत्रे घेतली. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या काळात ते पंतप्रधान होते.

  • १९९९ मध्ये भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • २००१ मध्ये आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.

Dinvishesh
आज काय घडले : राज्यात तंबाखू, गुटखाच्या जाहिरातींना बंदी

आज यांचा जन्म

  • हिपॅटायटीस लसीचे जनक नोबल पुरस्कार विजेता अमेरिकन चिकित्सक बारुच सॅम्युअल यांचा १९२५ मध्ये जन्म झाला.

  • पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात उद्योगपती व हिंदुस्तान लिव्हरचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक शेखर गांगुली यांचा १९३५ मध्ये जन्म झाला.

Dinvishesh
आज काय घडले : मुंबईत 24 तासांत तब्बल 995 मिमी पाऊस

आज यांची पुण्यतिथी

  • भारतातील कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या व नक्सलवाद विरोधी आपले आंदोलन सुरु करणाऱ्या चारू मजूमदार यांचे १९७२ मध्ये निधन झाले.

  • राष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर उर्फ राजाराम दत्तात्रय यांचे १९७५ मध्ये निधन झाले.

  • अर्जुन पुरस्कार सन्मानित सलग आठ वेळचे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे बॅडमिंटनपटू सय्यद मोदी यांचे १९८८ मध्ये निधन झाले.

  • पद्मविभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका महाश्वेतादेवी यांचे २०१६ मध्ये निधन झाले.

  • भारतीय चित्रपट अभिनेता व सहकलाकार इंदर कुमार यांचे २०१७ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com