आज काय घडले : जगातील पहिल्या टेस्ट ट्युबीचा जन्म
सुविचार
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वत:जवळ ठेवा.
आज काय घडले
१६४८ मध्ये आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने शहाजीराजे यांना कैद केले.
१९७८ मध्ये जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
१९८४ मध्ये सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.
२००७ मध्ये प्रतिभाताई पाटील देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.
आज यांचा जन्म
भारतातील आयरिश वन्यजीवतज्ज्ञ व लेखक जिम कार्बेट यांचा १८७५ मध्ये जन्म झाला.
संगीतकार व गायक सुधीर फडके यांचा १९१९ मध्ये जन्म झाला. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले.
मराठी कवी विश्वनाथ वामन बापट यांचा १९२२ मध्ये जन्म झाला. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता.
लोकसभेचे माजी सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा १९२९ मध्ये जन्म झाला.
आज यांची पुण्यतिथी
समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे १८८० मध्ये निधन झाले.
महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक व लष्करी शिक्षणाचे प्रसारक कॅप्टन शिवरामपंत दामले यांचे १९७७ मध्ये निधन झाले.
चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे २०१२ मध्ये निधन झाले. १९६४ ते १९९६ दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली.