आज काय घडले : चंद्रयान अपोलो ११ पृथ्वीवर परतले
सुविचार
खऱ्या विद्यार्थ्यांना कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
आज काय घडले
१९६९ मध्ये चंद्र मोहिमेनंतर अमेरिकन चंद्रयान अपोलो ११ पृथ्वीवर सुखरूप उतरले.
१९७४ मध्ये वॉटरगेट प्रकरणात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला, असा हा निकाल होता.
१९९१ मध्ये अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
१९९७ मध्ये माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००० मध्ये विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.
आज यांचा जन्म
बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष यांचा १९११ मध्ये जन्म झाला. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचा १९२८ मध्ये जन्म झाला.
भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक हरिकिशन गोस्वामी उर्फ मनोज कुमार यांचा १९३७ मध्ये जन्म झाला. त्यांनी देशभक्तीवर अनेक चित्रपट काढले.
विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा १९४५ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.
बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी यांचा १९८५ मध्ये जन्म झाला. पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आज यांची पुण्यतिथी
चित्रपट दिग्दर्शक व निर्माता अरुणकुमार चटर्जी ऊर्फ उत्तमकुमार यांचे १९८० मध्ये निधन झाले. हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी अभिनय केला.
नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचे १९७४ मध्ये निधन झाले