दिनविशेष 23 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 23 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge
Published on

Dinvishesh 23 October 2023 : सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 23 ऑक्टोबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.

१९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

१९४४: दुसरे महायुद्ध सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

१८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

१८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.

१७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

आज यांचा जन्म

१९७४: अरविंद अडिगा - भारतीय पत्रकार आणि लेखक

१९४५: शफी इनामदार - अभिनेते व नाट्यनिर्माते (निधन: १३ मार्च १९९६)

१९४०: पेले - ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू

१९३७: देवेन वर्मा - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: २ डिसेंबर २०१४)

१९२४: पं. राम मराठे - संगीतकार, गायक व नट संगीतभूषण (निधन: ४ ऑक्टोबर १९८९)

१९२३: मधुकाका कुलकर्णी - भारतीय श्री विद्या प्रकाशनचे संस्थापक (निधन: २२ फेब्रुवारी २०००)

१९२३: असलम फारुखी - भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान (निधन: १५ जुन २०१६)

१९००: डग्लस जार्डिन - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: १८ जून १९५८)

१८७९: अहिताग्नी राजवाडे - वैदिक धर्माचे पुरस्कर्ते (निधन: २७ नोव्हेंबर १९५२)

१७७८: कित्तूर चेन्नम्मा - कित्तूरची राणी (निधन: २१ फेब्रुवारी १८२९)

आज यांची पुण्यतिथी

२०१२: सुनील गंगोपाध्याय - बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

१९५७: ख्रिश्चन डायर - ख्रिश्चन डायर एस. ए. चे संस्थापक (जन्म: २१ जानेवारी १९०५)

१९२१: जॉन बॉईड डनलॉप - डनलॉप रबरचे संस्थापक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

१९१५: डब्ल्यू. जी. ग्रेस - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८)

१९१०: राम (पाचवा) - थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com