Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले: रेडिओ प्रसारणास सुरुवात

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म, लक्ष्मी सहगल यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

सुविचार

दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका, कर्म करत रहा. तेच तुमचा परिचय देतील.

आज काय घडले

  • १९२७ मध्ये मुंबई व कोलकोता केंद्रावरून रेडिओ प्रसारण करण्यास सुरुवात करण्यात आली. १९५७ मध्ये त्याचे आकाशवाणी असे नामाकरण करण्यात आले.

  • १९८३ मध्ये एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. त्यानंतर श्रीलंकेच्या सरकारने तामिळवंशीय नागरिकांवर हल्ला केले. जुलै महिन्यात १ हजार नागरिक ठार झाले.

  • १९९९ मध्ये केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

Dinvishesh
आज काय घडले : लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा

आज यांचा जन्म

  • स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक बाळ गंगाधर टिळक यांचा १८५६ मध्ये जन्म झाला. त्यांना ‘लोकमान्य' या उपाधीने गौरविले गेले.

  • क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर तिवारी यांचा १९०६ मध्ये जन्म झाला. त्यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची पुनर्बांधणी केली.

  • जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा १९२७ मध्ये जन्म झाला.

  • नाट्य व चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा १९४७ मध्ये जन्म झाला. व्यवसायाने ते मानसशास्त्रज्ञ आहे.

  • प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते व मनोचिकित्सक डॉ. मोहन अगाशे यांचा १९४७ मध्ये जन्म झाला.

  • महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचा १९६१ मध्ये जन्म झाला.

  • संगीतकार, गायक व चित्रपट अभिनेता हिमेश रेशमिया यांचा १९७३ मध्ये जन्म झाला.

Dinvishesh
आज काय घडले : लॉर्डसवर पहिला क्रिकेट सामना

आज यांची पुण्यतिथी

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे १९९९ मध्ये निधन झाले.

  • विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटातून भूमिका केल्या.

  • सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल लक्ष्मी सहगल यांचे २०१२ मध्ये निधन झाले. त्या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com