आज काय घडले : लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा
सुविचार
देणारा हा कायम सर्व श्रेष्ठ असतो... मग तो आधाराचा शब्द असो किंवा मदतीचा हात..!
आज काय घडले
१९०८ मध्ये ‘देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
१९४४ मध्ये पोलंड देशांत कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.
१९४७ मध्ये भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी त्याचा स्वीकार केला गेला.
आज यांचा जन्म
भारतीय शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्यातील गायक पंडित विनायक नारायण पटवर्धन यांचा १८९८ मध्ये जन्म झाला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक मुकेश म्हणजेच मुकेश माथुर यांचा १९२३ मध्ये जन्म झाला.
पत्रकार व लेखक गोविंद श्रीपाद तळवलकर यांचा १९२५ मध्ये जन्म झाला. साचेपी संपादक म्हणून त्यांची ख्याती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा १९५९ मध्ये जन्म झाला.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्ते व आशा संस्थेचे एक संस्थापक व सदस्य संदीप पांडे यांचा १९६५ मध्ये जन्म झाला.
भारतीय जनता पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस यांचा १९७० मध्ये जन्म झाला. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री होते.
आज यांची पुण्यतिथी
साहित्यिक आणि प्रकाशक गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ यांचे १९८४ मध्ये निधन झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी ठोकळांची आकाशगंगा ही त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली.
माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू ए. जी. क्रिपाल सिंह यांचे १९८७ मध्ये निधन झाले.