आज काय घडले : नील आर्मस्ट्रॉंगचे चंद्रावर पाऊल
सुविचार
झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरु नका.
आज काय घडले
१९०८ मध्ये बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली.
१९६९ मध्ये अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवले. चंद्रावर पाऊल ठेवणारे ते पहिले मानव ठरले. त्यानंतर लगेच दुसरे अमेरिकन अंतराळवीर एडविन एल्ड्रीन हे चंद्रावर उतरणारे दुसरे मानव ठरले.
१९७६ मध्ये मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहीत अंतराळयान उतरले.
आज यांचा जन्म
माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा १९१९ मध्ये जन्म झाला. त्यांनी २ मे १९५३ रोजी शेर्पा तेनसिंग नोर्गेबरोबर एव्हरेस्ट सर केले होते.
बनारस घराण्यातील प्रसिद्ध भारतीय तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा १९२१ मध्ये जन्म झाला.
हिंदी चित्रपट सृष्टीत ‘जुबली स्टार’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते राजेंद्रकुमार यांचा १९२९ मध्ये जन्म झाला. त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फ़िल्मफ़ेयर पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते व रंगमंच कलाकार नसीरुद्दीन शाह यांचा १९४९ मध्ये जन्म झाला. वयाच्या १४व्यापासून त्यांनी अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती.
आज यांची पुण्यतिथी
कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे १९४३ मध्ये निधन झाले. सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्यांकडे होते.
थोर क्रांतिकारक व भगत सिंह यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांचे १९६५ मध्ये निधन झाले. १९२९ मध्ये नवी दिल्लीमधील केंद्रीय विधिमंडळात त्यांनी भगत सिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका गीता दत्त यांचे १९३२ मध्ये निधन झाले. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्या त्या पत्नी होत्या.
भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश व भारतातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या ब्रिटीश महिला अन्ना चांडी यांचे १९९६ मध्ये निधन झाले.