आज काय घडले: लंडनमध्ये सावरकरांनी प्रथमच साजरी केली शिवजयंती

आज काय घडले: लंडनमध्ये सावरकरांनी प्रथमच साजरी केली शिवजयंती

Published by :
Team Lokshahi
Published on

२ मे १९०८ मध्ये प्रथमच विदेशात शिवजयंती उत्सव साजरा केला गेला. लंडनमध्ये स्वातंत्रवीर सावरकरांनी हा उत्सव साजरा केला.

आजचा सुविचार

ज्याला दु:खीची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव असावी .

आज काय घडले: लंडनमध्ये सावरकरांनी प्रथमच साजरी केली शिवजयंती
आज काय घडले : स्वामी विवेकानंद यांनी केली रामकृष्ण मिशनची सुरुवात

आज काय घडले

१९०८ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

१९९४ मध्ये बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झाले.

१९९४ मध्ये नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

२००४ मध्ये एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. ते २ मे २००४ ते १ जून २००४ दरम्यान या पदावर होते.

आज कोणाचा जन्म

हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा १९२० मध्ये जन्म झाला. मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते म्हणूनही त्यांनी काम केले.

ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा १९२१ मध्ये जन्म झाला. त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.

वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू ब्रायन लारा यांचा १९६९ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे १५१९ मध्ये निधन झाले. मोनालिसा, द लास्ट सपर, मॅडोना ऑफ द रॉक्स ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत.

लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे १९७३ मध्ये निधन झाले.

चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचे १९७५ मध्ये निधन झाले.

गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे १९९८ मध्ये निधन झाले.

भारतीय उद्योगपती मोहनलाल पिरामल यांचे २००१ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com