Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न

लिएंडर पेस यांचा जन्म, बाळासाहेब देवरस यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

१९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला.

सुविचार

खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका. कारण त्यात एक चांगला नियम आहे. आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही.

आज काय घडले

  • १९४४ मध्ये उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला आइसलंड प्रजाकसत्ताक झाला. आइसलंडमध्ये अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत.

  • १९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला.

  • २०१३ मध्ये उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी म्हणजेच १३ इंच विक्रमी पाऊस झाला. त्यात अनेकांचा मृत्यू झाला.

आज यांचा जन्म

  • लघुलेखक पद्धतीचे जनक, प्रकाशक,जॉन रॉबर्ट ग्रेग यांचा १८६७ मध्ये जन्म झाला.

  • नोबल पारितोषिक विजेता फ्रांस जीवशास्त्रज्ञ फ्रॅन्कोइस जेकब यांचा १९२० मध्ये जन्म झाला.

  • पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस यांचा १९७३ मध्ये जन्म झाला. पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे त्यांनी मिळवली आहे.

आज यांची पुण्यतिथी

  • मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे १६७४ मध्ये निधन झाले. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

  • समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लोकमान्य टिळक यांच्या केसरी वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचे १८९५ मध्ये निधन झाले.

  • भारतीय स्वतंत्रता संग्राम सेनानी, सामाजिक कार्यकर्ता व साहित्यकार गोपबंधू दास यांचे १९२८ मध्ये निधन झाले.

  • अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचे १९६५ मध्ये निधन झाले.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे १९९६ मध्ये निधन झाले.

  • सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्यांनी मुंबईमधील झोपडपट्ट्यातील निवासी लोकांच्या उत्कर्षासाठी काम केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com