Dinvishehs
DinvishehsTeam Lokshahi

आज काय घडले : अमेरिकेने केली अणूबॉम्बची चाचणी

कतरिना कैफचा जन्म, वासुदेव बेंद्रे यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

सुविचार

जगाला आवडेल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रॅण्ड म्हणून जगाल.

आज काय घडले

  • १९४५ मध्ये अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली. त्यानंतर ६ ऑगस्ट १९४५ रोजी जापानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.

  • १९६९ मध्ये चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण करण्यात आले.

  • १९९८ मध्ये गुजरात सरकारने शाळेत प्रवेश घेण्याच्या वेळी पाल्याच्या नावानंतर वडिलांच्या नावाप्रमाणे आईचे नाव लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

Dinvishehs
आज काय घडले : पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार

आज यांचा जन्म

  • मुंबई येथील गोवालिया टँक मैदानावर प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या क्रांतीकारक व शिक्षणतज्ञ अरुणा असफ अली यांचा १९०९ मध्ये जन्म झाला.

  • दक्षिण भारतातील ज्योतीर मठाचे मठाधीश व स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा १९१३ मध्ये जन्म झाला.

  • मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा १९१४ मध्ये जन्म झाला. कथासंग्रहांशिवाय त्यांनी ९२ ललितलेख, चरित्रे, प्रबंध, पाठ्यपुस्तके लिहिले आहेत.

  • नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा १९१७ मध्ये जन्म झाला.

  • पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी सर्वोत्कृष्ट भारतीय हॉकीपटू व कर्णधार धनराज पिल्ले यांचा १९६८ मध्ये जन्म झाला.

  • विकिपीडियाचे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा १९६८ मध्ये जन्म झाला. जिमी वेल्स सोबत त्यांनी विकिपीडिया हे संकेत स्थळ सुरु केले.

  • अभिनेत्री कतरिना कैफ यांचा १९८३ मध्ये जन्म झाला. त्यांनी तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटांतसुद्धा काम केले आहे.

Dinvishehs
आज काय घडले : डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण

आज यांची पुण्यतिथी

  • इतिहास संशोधन आणि इतिहास लेखक वासुदेव बेंद्रे यांचे १९८६ मध्ये निधन झाले. महाराष्ट्राचा १७ व्या शतकाचा इतिहासावर त्यांनी संशोधन केले.

  • नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे १९९४ मध्ये निधन झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com