Dinvishesh
DinvisheshTeam Lokshahi

आज काय घडले : पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार

नरहर कुरुंदकर यांचा जन्म , डॉ. बानू कोयाजी यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

सुविचार

दिल्याने वाढत जातं...मग तो सेवेचा आनंद असो, मदत असो किंवा समाधान..!

आज काय घडले

  • १६६२ मध्ये इंग्लंड येथील रॉयल सोसायटीची स्थापना करण्यात आली.

  • १९१६ मध्ये जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंगची स्थापना करण्यात आली.

  • १९५५ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • १९९६ मध्ये स्वाध्याय परिवारची स्थापना करणारे तत्वज्ञानी, आध्यात्मिक नेते, धर्म सुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला.

  • १९९७ मध्ये महाराष्ट्रीयन पर्यावरणवादी कार्यकर्ता महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

  • २००६ मध्ये सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ टि्वटर सुरु झाले. ट्विटरच्या साहाय्याने २८० शब्दापर्यंत पोस्ट करता येते.

Dinvishesh
आज काय घडले : डायनामाइट स्फोटकाचे यशस्वी परीक्षण

आज यांचा जन्म

  • खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा १९०३ मध्ये जन्म झाला.

  • जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा १९०४ मध्ये जन्म झाला. त्या ‘गानतपस्विन’ या उपाधीने ओळखल्या जातात.

  • विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा १९२७ मध्ये जन्म झाला. १९८८ ते ९१ या काळात ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु होते.

  • विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा १९३२ मध्ये जन्म झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन वेळा ते अध्यक्ष होते.

  • दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा १९४९ मध्ये जन्म झाला.

Dinvishesh
आज काय घडले : मुंबईत एकामागे एक तीन बॉंबस्फोट

आज यांची पुण्यतिथी

  • इटालियन सुप्रसिद्ध चित्रकार व विश्वातील सर्वात सुंदर चित्र मोनालिसाची निर्मिती करणारे लियोनार्डो दा विंची यांचे १५४२ मध्ये निधन झाले.

  • नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे १९१९ मध्ये निधन झाले.

  • बालगंधर्व नावाने परिचित असलेले नारायण श्रीपाद राजहंस यांचे १९६७ मध्ये निधन झाले. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात त्यांनी रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

  • कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे २००४ मध्ये निधन झाले. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com